रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- तालुक्यातील तालुक्यातील अंभोरे वाडी कडवंची शिवार येथे दिनाक 25 मार्च रोजी दुपारी 12 वाजता शेततळ्यात सुमीत्रा माणिक वानखेडे व समाधान माणिक वानखेडे या माय लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आज दिनांक 27 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके व पदाधिकाऱ्यानी कुटुंबाची सांत्वन पर भेट घेतली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, महीला जिल्हाध्यक्षा रमाताई होर्शिळ, तालुकाध्यक्ष भानुदास साळवे, युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीष रत्नपारखे, तालुका महासचिव वैभव वानखेडे, सचिव गौतम वाघमारे, तालुका उपाध्यक्ष विलास नरोडे, सुखदेव खरात, संघर्ष पंडित, अंकुश गाडेकर, साहेबराव तायडे. गिरधरी गवई, राजेश वानखेडे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

