आशिष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे देशात आणि राज्यात युती विरुद्ध आघाडीने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. त्यात अजून पर्यंत काही जागेवर युती आणि आघाडीत जागे संदर्भात वाद सुरू असल्याचे चित्र दिसून येत असल्याने राज्यात बैठकीचे खलबते सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात काँग्रेस कडून राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पारड्यात पाडून घेतलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघातून आर्विचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या रामदास तडस यांना जोरदार टक्कर देणारा उमेदवार मिळाला असल्याची चर्चा संपूर्ण वर्धा जिल्हात सुरू आहे.
त्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्करराव भगरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिय सुळे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, शिरूर लोकसभा मतदार संघातून अमोल कोल्हे, अहमदनगर मतदार संघातून निलेश लंके अशा पाच उमेदवारांची आम्ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित उमेदवारांची यादी पुढील काही दिवसांत जाहीर केली जाईल, अशी माहिती पक्षाने दिली आहे.