सुनिल भांडेकर यांनी दिले उपविभाग अधिकारीला निवेदन.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड/माजलगाव:- माजलगांवतील मंडळ अधिकारी कृष्णा पुराणिक यांनी तक्रारदाराला आंधारात ठेवून समोरच्याकडून 50 हजार रुपये घेऊन सुनावणीचा चुकीचा निकाल देऊन व खातेफोड करून तक्राराच्या कुटुंबाची फसणुक केल्याबद्दल सदर प्रकरण 11 895 चालू असताना कुटुंबाच्या मिलकती व अर्जदाराची नुकसान व फसणूक व्हावी या उद्दिष्टाने स्वतःचा फायदा करून घेऊन मिळकतीस नावे नोंदविली आहे म्हणून मंडलाधिकारी अधिकारी व तलाठी यांच्या यांच्यावर फसवणूक व कायदेशीर गुन्हा नोंद करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना 28 मार्च रोजी सुनील भांडेकर यांनी दिले.
सविस्तर माहितीनुसार सुनील दामोदर भांडेकर राहणार माजलगाव यांनी माजलगाव उपविभाग अधिकारी कार्यालयात दिलेले निवेदनात म्हटले आहे की 11 895 फेरफार वर नाव लावण्याच्या संदर्भात 28 जुलै 2023 पासून मंडळाधिकारी कृष्णा पुराणिक यांच्याकडे एकत्र कुटुंबाची सदर सुनावणी सात महिने चालू असताना 15 फेब्रुवारी 2024 रोजी मंडळ अधिकारी व तलाठी व शरद भांडेकर यांच्या सहमताने आणि गट क्रमांक 201 मधील शरद दामोधर भांडेकर यांच्या नावे असलेली 1, 69 आर याची खाते फोड शार्दुल भांडेकर व संध्या भांडेकर यांच्या नावे सदरील सुनावणी चालू असताना व कुटुंबाचा वाद चालू असताना व त्यांच्या समोर सात महिन्यापासून सुनावणी चालू असताना कुटुंबाच्या एका सदस्याच्या नावे असलेली जमीन शरद भांडेकर यांनी व मंडळ अधिकारी पुराणिक यांनी मिळून गट क्रमांक 201 निपानीटाकली येथील जमीनीची खातेफोड पैसे देऊन करण्यात आली.
त्यादरम्यान दोन-तीन वेळेस सुनील भांडेकर यांनी इतर मालमत्ता संबंधित मंडलाधिकारी यांना चौकशी केली असता उढवा उढवीचे उत्तर दिले मला माहित नाही असे सांगितले असता ही परस्पर पैसे देऊन व घेऊन शरद भांडेकर यांनी मंडळाधिकारी यांना पैसे देऊन स्वतःच्या कुटुंबाच्या नावे खाते खोड करून घेतली 11 895 सुरज सुनील भांडेकर यांच्या फेरफारला नावे लावण्यासाठी घरातील एकूण आठ सदस्या पैकी सहा सदस्यांची समंती असतांना व मेरीट असतांना सुरज सुनील भांडेकर यांचे रजिस्टर बक्षीस पत्र व दस्तावेज नंबर 3721, 23 असून त्यांची नोंद मंडळ अधिकारी कार्यालय घेण्यात आली नाही.
यावेळी शरद भांडेकर यांनी 18 जून 2023 रोजी नोटरी दस्तावेज करून घेतला परंतु 10 जून 2023 रोजी आईच्या व बहिणीची कोऱ्या स्टॅम्प पेपर वर आईला सांभाळ करतो म्हणून सह्या घेऊन मागील तारखेस 18 जानेवारी 2023 रोजी त्यावर बक्षीस पत्राचा मजकूर लिहून कुटुंबाची फसणुक केल्यामुळे बहिण व आईने बक्षीस पत्र चुकीचे खोटे व बनावट आहे असे लेखी निवेदन मंडळाधिकारी यांच्याकडे दिलेले असताना दिनांक 28 मार्च 2024 रोजी मंडळ अधिकारी यांनी 11 8 95 चा निकाल दिला आहे.
या सुनवणीच्या निकाल पुढीलप्रमाणे सदरील प्रकरणाचा आदेश असा काढला की प्रकरण न्यायलयाच्या निकाल लागेपर्यंत प्रलंबित ठेवण्यात यावा असा आदेश पारित केला आहे. सदरील न्यायलयाचा स्टे आर्डर व न्यायलयाचा कुठलाही आदेश नसताना न्यायलयाचे हे प्रकरण प्रलंबितचा आदेश काढला आहे असा आदेश पैशाची देवाणघेवाण करुन काढला आहे असा आरोप सुनील दामोदर भांडेकर यांनी केला आहे तरी उपविभाग अधिकारी यांनी या प्रकरणाची सकल चौकशी करून संबंधित मंडलाधिकारी अधिकारी कृष्णा पुराणिक आणि शरद भांडेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करून संबंधित यांच्यावर कारवाई करावी तक्रारादारास न्याय द्यावा.
याअगोदर ही माजलगाव तालुक्यातील पाच ते सहा फेरफार व नाव लावने प्रकरणात मंडळअधिकारी अधिकारी पुराणिक यांच्यावर तक्रारी आहेत. परंतु वरिष्ठ अधिकारीची पाठराखन असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. या अधिकारी वर निलंबनाची कार्रवाईची मागणी नागरिकातुन होत आहे.