प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्हात रेती तस्करी वर आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हात रेती उत्खनन करून तस्करी करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
देवळी तालुक्यातील यशोदा नदीपात्रातून अवैधरीत्या इंजिन बोटीद्वारे जेसीबी आणि पोकलॅण्डच्या साहाय्याने सुरू असलेला अवैध वाळू उपसा करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी छापा मारत वाळू भरलेले चार टिप्पर, एक हायवा ट्रक, दोन ट्रक्टर, एक जेसीबी, पोकलॅण्ड, इंजिन बोट, वाळू विक्रीची नगदी ४९ हजार ८०० रुपये, ११ मोबाइल असा २ कोटी १५ लाख ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत १४ चालकांना बेड्या ठोकल्या. तर सात तस्कर फरार झाले. ही कारवाई २९ रोजी मध्यरात्री टाकळी (चना) येथे करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी चालक घाटमालक प्रकाश पांडुरंग सुस्कार, सचिन गोविंदराव पाल (रा. क्षीरसमुद्रपूर, ता.सेलू), बाबाराव चोखोबाजी कांबळे (रा. वर्धा, अशोक दामाजी कुरसंगे (रा. वर्धा), रवींद्र दीपक लव्हाळे (रा.खरांगणा गोडे) जयेंद्र जगदीश तकोडिया (रा. शिवणी, छपरा, म.प्र.).रवी महादेव आत्राम (रा. राळेगाव, जि.
यवतमाळ), विहेंद्र सावनहर ताकोडिया (रा. शिवानी, छपरा, म.प्र.), दीपक बिलसू उईके (रा. शिवणी, म.प्र.), शैलेश प्रभाकर डोनालकर (रा.शिरसगाव धनाडे), राहुल तुळशीराम वाघमारे (रा. पारडी चाकूर), सत्येंद्र अनिललाल इनवती (रा. सूरडोंगरी, जि. शिवनी,म.प्र.), विजय अरुण डावरे (रा. वर्धा) अशी अटक केलेल्या चालकांची नावे आहे. तर टिप्परमालक नरेंद्र नवनाखे (रा. वर्धा), अमर काळे (रा. वर्धा), संतोष नवरंगे (रा. वर्धा), अभिषेक ठवळे (रा.वर्धा), बोट मालक राहुल साटोणे (रा. वर्धा), विनोद भोकरे (रा. राळेगाव, जि.यवतमाळ), योगेश नामक तरुण (रा.मोहदा, जि. यवतमाळ) अशी फरार असलेल्या तस्करांची नावे आहे.
वाळू डेपोच्या नावे अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी विशेष पथकातील पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, अंमलदार रोशन निंबोळकर, सागर भोसले, कैलाश वालदे, प्रदीप कुचनकर, संदीप गावंडे, सुगम चौधरी, शुभम बहादुरे, तसेच अधिकारी व अंमलदारांसह वाळूघाटावर छापा मारला असता रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या इंजिन बोट,बपोकलैंड मशीन व जेसीबीच्या साहाय्याने वाळूचा उपसा सुरू
असल्याचे आढळले. मौजा टाकळी (चना) येथील सोनेगाव (बाई) डेपो क्रमांक 3 हा गुरुकृपा फ्लाय अॅश कंपनी प्रो. प्रकाश पांडुरंग सूस्कार (रा. राधाकृपा चौक), रानडे प्लॉट वर्धा याच्या नावे असून त्या ठिकाणी नियमबाह्य वाळूचे उत्खनन
करून ती डेपोमध्ये जमा न करता परस्पर चोरटी वाहतूक करून शासनाची फसवणूक करीत महसूल कागदपत्रांत फेरफार करून शासनाचा महसूल स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी चोरी करीत असल्याचे आढळले.
पोलिसांनी याप्रकरणी १४ टिप्पर चालकांना अटक करून देवळी पोलिस ठाण्यात डांबले, तर टिप्पर मालक फरार झाले. या कारवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, सहायक
पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण,देवळीचे तहसीलदार दत्ता जाधव,देवळीचे पोलिस निरीक्षक सार्थक नेहते
यांचीही उपस्थिती होती. या कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले आहे.