मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गुड्डीगुडम:- रॉयल पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कुल धानोरा येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी दरवर्षी केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे पुढील शिक्षणासाठी निवड होत असतो.
रॉयल पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कुल धानोरा येथे इयत्ता ५ वी त शिकणारी विद्यार्थ्यांनी हेमाक्षी दयाराम कवालिया हिने नवोदय विद्यालयाचे परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्याने हीचा गडचिरोली जिल्ह्यातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झालेला आहे.
हेमाक्षी दयाराम कवालिया हिने नवोदय विद्यालयात निवड झाल्याचे यशाचे श्रेय प्राचार्य एम. बी.पेंड्याला सर व शिक्षकवृंद आपल्या आई वडील यांना दिले आहे. हेमाक्षी हिच्या यशाबद्दल प्राचार्य पेंड्याला सर, आई वडील, शिक्षकवृंद विद्यार्थ्यांनी तिचा अभिनंदन केले.