अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मागील अनेक दिवसापासून घरफोडीचे सत्र सुरु असुन यात चोरट्यांची शिरजोरी वाढल्याचे दिसून येते. चोरट्यांची घातलेल्या धुमाकुळामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वार्ड आणि पदमावती नगर मध्ये अज्ञात चोरट्यानी घरी कुणी नसल्याचे पाहून संधी साधली. उमेश हरिशचंद्र वानखेडे रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हे लग्न समांरभा करीता बाहेरगावी गेले व लग्न समारंभ आटोपुन घरी परत आले असता मुख्य दाराचे कुलूप तोडलेले दिसले व घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले. कोणीतरी अज्ञात ईसमाने घरातील आलमारी मधील 5 ग्राम सोन्याची गोफ किमंत 15,000, 3 ग्राम वजनाचे कानातील रिंग किमंत 9000, सोन्याची अंगठी 1 ग्राम किमंत 3000, सोन्याचे 3 ओम किमंत 9,000, लहान मुलांचे चांदीचे दोन तोळ्याचे कडे किमंत 700, असा एकुन 36,700 रू चा माल चोरून नेला.
याची माहिती हिंगणघाट पोलीस स्टेशनला दिली. याप्रकरणी हिंगणघाट पोलीसानी अप. क. 485/24 कलम 454, 457, 380 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
दुसऱ्या घटनेत मोपेड लंपास, पोलीस स्टेशन हिंगणघाट मध्ये घरफोडीबाबत गुन्हा दाखल.
गणेश हनुमंतराव सावरकर रा. पदमावती नगर हिंगणघाट हे चंद्रपूर येथे नोकरीला असल्याने घराला कुलुप लावुन तिथे रहन्यास जेल. त्याच्या घरा शेजारी राहणारे ज्योती हिने फोन करून सांगीतले की घराचे कुलुप तुटन पडले आहे. तेव्हा त्यांनी घरी येवुन पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त पडुन असुन त्यांच्या मालकीची सुझुकी मोपेड क्र. एम. एच. 32 ए. एन. 3055 किमंत 40,000/- रू ची कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरून नेली.
पोलिसांनी गणेश हनुमंतराव सावरकर यांच्या तक्रारी वरून हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अप. क. 484/24 कलम 454, 457, 380 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास पोलीस करत आहे.