पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र
संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुर येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येते अवैध शस्त्रांच्या खरेदी विक्री पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. ऐन लोकसभेच्या निवडणूकीच्या काळात पिस्तुल खरेदी – विक्रीच्या रॅकेटचा भंडाफोड पोलिसांनी केला आहे. त्यात पोलिसांनी एका युवकाच्या घरातून पिस्तुल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर पुढील लिंक पोलिसांना सापडल्या. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
एका तरुणाच्या घरातील हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी घरावर छापा घातला. या छाप्यात दोन काडतूस आणि पिस्तुलसह खरेदी-विक्री करणाऱ्यांची लिंक सापडली. पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. मोहम्मद फिरोज उर्फ मोहम्मद आबिद अंसारी वय 24 वर्ष, दीनबंधू सोसायटी, गुलशननगर याच्याकडे पिस्तुल असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्याने हे पिस्तुल करीम राजा मोहम्मद युनूस वय 24 वर्ष, मेमन कॉलनी जुना कामठी रोड, कळमना याच्याकडून घेतल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्याला देखील अटक केली.
यावेळी पोलिसांनी आरोपीने कडून चौकशीत मोहम्मद फिरोज याने पिस्तुल मोहम्मद शाकिब उर्फ पटेल मोहम्मद सिद्दीकी वय 28 वर्ष, संजीवनी कॉलनी, यशोधरानगर याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील लिंक शोधली असता अब्दुल सोहेल उर्फ सोबू सतरंजीपुरा आणि अजहर यशोधरा नगर यांच्याकडून पिस्तुल खरेदी केल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांकडून या दोघांचाही शोध सुरू आहे.
सोबू हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या प्रकरणात अनेकदा त्याला अटक सुद्धा झाली आहे. पुढील चौकशी साठी तिन्ही अटकेतील आरेापींना कळमना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, नवनाथ देवकाते, मिलींद चौधरी, प्रवीण लांडे, अमोल जासूद, संतोष चौधरी, मनिष रामटेके, अनिल बोटरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.