पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहर एका पोलीस कर्मचाऱ्यांने पोलीस चौकीतच स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडत आत्महत्या केल्याने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. भारत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीत ही खळबळ जनक घटना घडली आहे.
भारत दत्ता आस्मर या पोलीस कर्मचाऱ्याने शुक्रवारी पहाटे गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी जीवन संपवले, हे चौकशीतून स्पष्ट होणार आहे.
पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात भारत आस्मर हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी ते कामावर आले होते. त्यांची नेमणूक असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीत गेले. रात्री आपली बंदूक सोबत घेऊन वर असणाऱ्या खोलीत आरामासाठी गेले. परंतु अचानक काय झाले त्यांनी स्वत:वर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
दहा वर्षांपूर्वी पोलीस दलात निवड: भारत दत्ता आस्मर मागील काही दिवसांपासून तणावात होते. परंतु त्यासंदर्भात ते कोणाकडे काही बोलले नव्हते. त्यांच्या तणावाचे कारण समजले नव्हते. गेल्या आठ, दहा वर्षांपूर्वी ते पोलीस दलात दाखल झाले होते. या घटनेची आता चौकशी करण्यात येणार आहे.