उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असणारे ॲड. मुरलीधर इंगळे यांची नोटरी पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या पुढाकाराने अशोक वाटिका येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण, जिल्हा कार्याध्यक्ष देविलाल तायडे, जंजाळ साहेब, बाळासाहेब अंभोरे, सुनिल शिरसाठ, आनंदा पळसपगार, सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे, उमेश इंगळे सामाजिक कार्यकर्ता, अँड मुरलीधर सुखदेव इंगळे, जितेंद्र अहीर, मुक्ताराम घुगे, शंकर कंकाळ (संस्थापक अध्यक्ष मिशन अभ्यासिका) इत्यादी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.