अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा कार्यकर्ते तसेच महीला आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
हिंगणघाट शहरातील टिळक वार्ड येथील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आ.समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेश आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने शिवसेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव झाडे, मंगेश गुजर, राजू भोसकर, नरेश किन्हेकर, अरुण पोगले, दिनेश कोहाड, गणेश गुळघाणे, श्रीकांत कोटकर, विजय गुरनुले, उमेश डांगरी, राकेश फुलमाळी, प्रतीक साटोणे, मनीष बेदी, किरण कुटेमाटे, विनोद वाकडे, अनिकेत वाकडे, आशुतोष बाकडे, अभिजीत नोकरकार, रवी लाजुरकर, विशाल चिंचुलकर, अमोल चंदनखेडे, नीरज गुजर, विलास कुंभारे, सुमित मसराम, अशोक मसराम, राम पांडे, राहुल मधुकर बाकडे, प्रेमराज कुंभारे, विजय कुंभारे, सचिन कुंभारे, प्रवीण गुजर, कुंदन गुजर, करण गुजर, संजय काटकर, उरकुडा बिडवाईक, सुवर्णा किन्हेकर, विद्याताई काटकर, अरुणा कोहाड, भारतीय रणदिवे, वृषाली पोगले , मीना वाकडे, विद्या नागरकर, वैशाली खेकडे, करून बडेरे, देवकाबाई कुंभारे, वासुदेव कामडी, रामदासजी काटकर, विनोद झाडे, मंगेश गोहने, वैभव गोहणे, डॉ. रामदास वरघणे, दीपक झाडे, सरला काटकर, विशाल गुजर, नरेश गाहणे, दत्तू वाघमारे ईत्यादी महिला व पुरुष कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.
सदर कार्यक्रम वेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, हिंगणघाट ग्रामीण तालुकाध्यक्ष विनोद विटाळे, शहर अध्यक्ष भूषण पिसे, शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, ओबीसी शहराध्यक्ष अनिल चाफले, देवा पडोळे, माजी नगर सेवक नरेश इवनाते, मुन्ना त्रिवेदी, संजय मगर, राजु माडेवार , शंकरराव झाडे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.