मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय लोकसभेच्या निवडणूक पर्वाचे सत्र सुरु झाले असतांना सर्वत्र प्रचाराचा वेग वाढला असून विविध नेत्यांच्या सभा, रँली, यात्रा यांच्या बातमी मतदारा पर्यन्त पोहचावी हे लोकशाहीत चौथा स्तंभ असणा-या पत्रकारांची जबाबदारी असते आणी ती जबाबदारी पत्रकार म्हणून विना मोबदला स्थानीय पातळीवरील पत्रकार पार पाडीत असतात पण सोमवार दिनांक 8 एप्रिल रोजी भाजपाच्या महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथे टाका ग्राउंड येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली, या सभेपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांविषयी जे वक्तव्य केले ते मोहिते खासदार होण्या अगोदर प्रशासनाचे कर्मचारी नंतर खासदार मंत्री म्हणून असाच उचले धंदेवाईक बनल्यामुळे त्यांना ज्यांनी नौकरी पेशातून बाहेर काढीत खासदार, मंत्री केले ते त्यांचेच झाले नाही तर आयाराम-गयाराम नेते होऊन दलबदलू नेतेगीरी चमक दाखविण्याच्या प्रयत्नात पत्रकारांना बदनाम करण्यात धन्यता मानण्यापेक्षा सुबोध मोहिते यांनी प्रथम आपलाच ईतिहास बघावा त्यानंतरचं पत्रकार मंडळीवर बीन-बुडाचे आरोप करावे असा मार्मिक सल्ला अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे वर्धा जिल्हाध्यक्ष तथा दैनिक मतदारचे जेष्ठ पत्रकार प्रदीपकुमार नागपुरकर यांनी केले.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून शासनकर्ते, प्रशासन, न्यायपालिका यांच्यातील सामान्य जनतेला सत्यापन पोहचविण्यासाठी कार्यरत असणारे दूवा आहे तेव्हां त्यांच्याविषयी दुराग्रह भावना ठेऊन आपली नेतेगीरी उज्वल करण्याचे स्वप्न बघणा-या नेत्यांनी पत्रकारांची प्रतिभा मलीन करुन असे उचले धंदे बंद करावे असे जेष्ठ पत्रकार प्रदीपकुमार नागपुरकर म्हणाले. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या सर्व पत्रकार व हिंगणघाट शहरात पत्रकारा बद्दल पहिल्यांदा अशा प्रकारच्या जाहीर सभेत विधान झाल्यामुळे पत्रकारांच्या भावनेला ठेच पोहचली असून ह्या प्रकाराचा जाहिर निषेध व्यक्त करीत सुबोध मोहितेच्या सर्वे कार्यक्रमावर जिल्हातीलचं नव्हे तर सर्व ठिकाणच्या पत्रकारांनी बहिष्कार करावा असेही नागपुरकर म्हणाले. जेव्हा पर्यंत पत्रकारांचे समक्ष येऊन माजी केन्द्रीयमंत्री सुबोध मोहिते जाहिर माफी मागत नाही, तोपर्यंत या नेत्याचा जाहीर बहिष्कार करण्यात येईल अशी रोखठोक भूमिका पत्रकारांनी घेतली. यावेळी अन्य पत्रकार वर्ग मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.