अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपचे चंद्रपुर लोकसभा क्षेत्रा करीता उभे असलेले उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांबाबत केलेल्या घाणेरड्या व अश्शील वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महा विकास आघाडीच्या शेकडो महिलांनी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट व ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना याबाबत निवेदन देऊन या प्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांचेवर कठोर कारवाई करून त्यांची उमेदवारी रद्द करावी अन्यथा महिला काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
सुधीर मुनगंटीवार यासारखे खासदार निवडून दिल्यास महिलांचा किती सन्मान राखला जाईल हा प्रश्न पडतो, असे मत याप्रसंगी उपस्थित महिलांनी अधिकाऱ्यासमोर मांडले. यावेळी रागिणी शेंडे उपाध्यक्ष वर्धा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, मंदाकिनी ढाले शहर अध्यक्ष हि. काँग्रेस, सुनीता तळवेकर, सुनीता गुजरकर, निशा डोफे, शकुंतला बावणे, दीपाली हिवंज, सुजाता जांभुलकर, विद्या गिरी, प्रतिभा भराडे, चंदा तळवतकर, दीपाली रंगारी, मीनाक्षी ढाकणे, सुनीता तांमगाडगे, आचल वकील, इत्यादिसह असंख्य महिलांची उपस्थिती होती.