अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील पिपरी (पोहणा) येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या श्रीमती छबुताई अजाबराव चरडे यांचे आज दुपारी १२.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते.
पिपरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सतीश चरडे यांच्या त्या मातोश्री आहेत. श्रीमती छबुताई अजाबराव चरडे यांच्या दुःखद निधनाने चरडे कुटुंबीयांची हानी झाली. त्यांचे मागे तीन विवाहित मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१५ रोजी सकाळी 11 वाजता पिपरी येथील निवासस्थानावरून निघणार आहे.

