संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- राष्ट्रपुरुषांनी, महामानवानी आपल्या देशाला सत्य, अहिंसा, समता आणि बंधुता याची शिकवण दिली आणि संविधानाच्या माध्यमातून निकोप लोकशाहीची निर्मिती केली. मात्र याच लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण झाला असून आता कुठलाही पक्ष, धर्म, जात न बघाता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मत देऊन देश, संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचे आवाहन निर्भय बनो संघटनेचे प्रवक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आणि अँड असिम सरोदे यांनी केले.
आमची लढाई मोदी, शहांशी नसून त्यांच्या लोकशाही व जन विरोधी भूमिके विरूद्ध आहे. भाजपच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात देशातील शेतकरी, महिला, व्यापारी, कामगार, बेरोजगार, गरिब यांचेवर मोठा अन्याय करून या सर्वांना देशोधडीला लावण्याचे काम केले. यामुळे मोठय़ा प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्यात मात्र मोदी सरकारला याचे काहीही सोयरसुतक नाही. नव्या पिढीला बुरसटलेले थोतांड शिकवायचे की विज्ञान तंत्रज्ञान याचा निर्णय आता मतदारांना घ्यायचा आहे. भाजप सरकारने सर्व संवैधानिक संस्थांवर दबाव आणून सोईचे निर्णय घेण्यास बाध्य केले हा अतिशय दुर्दैवी प्रकार असून याचा निषेध मतदारांनी मतदानातून व्यक्त करावा असे मत त्यांनी मांडले.
शुभम हाल राजुरा येथे निर्भय बनो संघटनेच्या वतीने आयोजित सभेत आमदार सुभाष धोटे, अँड. सदानंद लांडे, अँड अरूण धोटे, विनोद दतात्रय, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, उमाकांत धांडे,प्राचार्य दौलत भोंगळे, रंजन लांडे, विकास देवाळकर, कुंदा जेणेकर, संध्या चांदेकर, निर्मला कुडमेथे, एजाज अहमद, अँड. चांदेकर, अँड. प्रशांत अटाळकर, अँड. मारोती कुरवटकर यासह शेकडोंच्या संख्येने महिला व नागरीक उपस्थित होते.