हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात आणि चंद्रपूर जिल्हात एटीएमच्या मशीन पैसे काढून अनेक नागरिकांची फसवणूक सुरू असल्याचा घटना मागील काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात चंद्रपूर पोलिसाना मोठे यश आले आहे. एटीएम मशीन मध्ये सिल्व्हर रंगाची पट्टी लावून पैसे चोरणाऱ्या टोळीला चंद्रपूर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रविवारी 14 एप्रिलला सायंकाळी पाच वाजताच सुमारास चंद्रपूर शहरातील सिंदी कॉलनी, दुर्गा माता मंदिर समोरील कॅनरा बँकेचे एटीएममध्ये पैसे काढण्याकरीता गेले असता अज्ञात इसमाने एटीएम मशिनला सिल्वर रंगाची पट्टी लावुन लक्ष विचलीत करून 5 हजार रूपये चोरून नेली अशी तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन, रामनगर येथे दाखल केली. सदर तक्रारीवरून कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासालां सुरुवात केली.
चंद्रपूर शहरातील वेगवेगळया ठिकाणी एटीएम मधील पैसे चोरीच्या घटना लक्षात घेता, पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल गाडे, पोलीस स्टेशन, रामनगर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक, रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी रवाना होवुन परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक केले. गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक पध्दतीने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी कार्तीक शंकर मामीडवार (वय २७) वर्ष रा. लालपेठ कॉलरी, बाबुपेठ चंद्रपूर तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन गुन्हयातील फिर्यादी हिचे चोरून नेलेले पैसे जप्त करण्यात आले.
आरोपी तसेच विधी संघर्षग्रस्त बालकांना अधिक विचारपुस केले असता त्यांनी यापुर्वी चंद्रपुर शहरात अंदाजे 5 ते 7 ठिकाणी एटीएम मशिनला सिल्वर रंगाची पट्टी लावुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच बल्लारशाह येथे सुध्दा पेपर मिलचे समोरील एटीएम मधुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून पाच हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल गाडे, पो. नि. यशवंत कदम तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर पोलिसांनी केली आहे.