२१ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील जुन्या वस्तीतील ३०० वर्षीय पुरातन ऐतिहासिक दिगंबर जैन मंदिराचा भव्य दिव्य जीर्णोद्धार सोहळा दिनांक २१ एप्रिल ते दिनांक २७ एप्रिल या दरम्यान संपन्न होत असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर धार्मिक उत्सवा करता देशभरातून सुमारे २५ हजार भाविक भक्त उपस्थित राहणे अपेक्षित आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रसंत गणाचार्य विरागसागर जी यांनी दिली.
पू. मुनी श्री म्हणाले की, समस्त हिंगणघाट वासीयांच्या पुण्योदयाने श्री १००८ मज्जीनेंद्र पंच कल्याणक प्रतिष्ठा, रथोत्सव व विश्वशांती महायज्ञ २१ ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. जैन तत्वज्ञानातील सर्वात मोठी पूजा पंच कल्याणाक आहे. जो व्यक्ती या महान उत्सवात मन, वचन, आणि कायाने तसेच तन, मन आणि धनाने सहभागी होतो, त्याला शाश्वत सुखाची प्राप्ती होते. पू. मुनी श्री विशेषसागरजी गुरुदेव यांच्या प्रेरणेने ३०० वर्षे जुन्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास येत आहे.
या प्रतिष्ठेला पूर्ण सानिध्य देण्यासाठी मुनिश्री विशेषसागर जी महाराजांचे शिक्षा- दीक्षा प्रदाता गुरु प. पू भारत गौरव, राष्ट्रसंत गणाचार्य श्री १०८ विरागसागर जी महामुनिराज संघ (३२) साधूंची अतिशय क्षेत्र श्रेयांस गिरी (म.प्र.) येथून १६ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्रा कडे मंगल विहार झाला. ११ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आचार्य श्री ससंघाचे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत मंगल पदार्पण झाले. पू. आचार्य श्री दररोज 20-22 किलोमीटर चालत भगवान महावीर स्वामींच्या जन्म जयंती २१ एप्रिल रोजी हिंगणघाट येथे पोहोचतील. येथे सकाळी ७ वाजता बिडकर महाविद्यालयाजवळ शहरातील मान्यवर व्यक्तींच्या द्वारे स्वागत होणार असून सकाळी ७.३० वाजता आंबेडकर चौकात गुरु-शिष्याचे मिलन होईल. शहराचा दौरा करताना संघ बी.एल. मोहता कंपाऊंड, राम मंदिर वॉर्ड येथे पोहोचेल, सकाळी १० वाजता स्वागत गीत, गुरुपूजा, शास्त्र सादरीकरण आणि पू आचार्य श्रींचे प्रवचन होईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आले. यावेळी माजी कृषी अधिकारी संजय साखरे, विनोद पोसदार, अमोल बिडकर, संदीप इंदाने, अनिल दाऊ आदी उपस्थित होते.