उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी तमाम गरीब, वंचित मुले आणि मुलीसाठी शिक्षणाचे दार उघडून घरोघरी शिक्षणाची ज्योत प्रज्वलीत केली आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्याय, समता, अधिकार आरक्षण दिले.
ज्ञानज्योती मुलींची निवासी निःशुल्क अभ्यासिका हे ज्ञानरूपी पुष्प अर्पण करून स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती करून अभिवादन करण्यात आले. स्वयंदीप संस्थेच्या वतीने 15 सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकातील मुलींसाठी निवासी अभ्यासिका पुणे येथे सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य, भोजन, राहण्याची व्यवस्था मोफत आहे. या दोन्ही महामानवांना वैचारिक वंदन करीत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत चळवळीत सातत्याने सक्रिय असलेल्या आचार्य रतनलाल सोनाग्रा यांच्या हस्ते 14 एप्रिल 2024 रोजी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी स्वयंदीप सोशल फाउंडेशन स्वयंमसेवक पदाधिकारी आणि विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी स्वयंदीप सोशल फाउंडेशनच्या विविध समाज उपयोगी उपक्रमाची प्रसंशा केली आणि पुढील वाटचालिकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या.