युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा आज थंडावल्या आहेत. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुपा प्रचार सुरू झाल्याचं दिसतंय.
विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 ला पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 17 एप्रिल ला भंडारा-गोंदिया लोकसभेतील अर्जुनी मोरगाव विधानसभा आणि गडचिरोली-चिमूर लोकसभेतील देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजता प्रचारतोफा थंडावल्या आहेत. तर गोंदिया आणि तिरोडा या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये सायंकाळी 6 वाजता प्रचारतोफा थंडावल्या.
19 एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी मागील 17 दिवसांपासून प्रचार सुरू होता. या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावल्यात. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत पडोळे तर महायुतीच्या वतीने सुनील मेंढे हे एकमेकांसमोर उभे आहेत. या दोन्ही उमेदवारांसह सर्वच उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी मोठं शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढल्या. त्यानंतर त्यांच्या प्रचारतोफा 6 वाजता थंडावल्या असून आता उमेदवाराकडून भेटीगाठी वर भर दिला जाणार आहे.
अशा असतील विदर्भातील लढती
नागपूर:- नितीन गडकरी, भाजप – वि – विकास ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस
रामटेक/ नागपुर ग्रामीण:- राजू पारवे, शिंदे गट – वि – श्यामकुमार बर्वे, राष्ट्रीय काँग्रेस
भंडारा /गोंदिया:- सुनील मेंढे, भाजप – वि – प्रशांत पडोळे, राष्ट्रीय काँग्रेस
गडचिरोली-चिमूर :- अशोक नेते, भाजप – वि – नामदेव किरसान, राष्ट्रीय काँग्रेस
चंद्रपूर:- सुधीर मुनगंटीवार, भाजप – वि – प्रतिभा धानोरकर, राष्ट्रीय काँग्रेस