राजुरा तालुका पत्रकार संघाची पंचवार्षिक निवडणूक संपन्न.
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 22 एप्रिल:- राजुरा तालुका पत्रकार संघ राजुरा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर नोंदणी क्रमांक एफ 6472(चं) या संस्थेची सन 2024-2029 करिता कार्यकारणी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली.
यामध्ये अध्यक्ष म्हणून बी. यु. बोर्डेवार, कार्यवाहक अध्यक्ष उमाकांत आबाजी धोटे, उपाध्यक्ष प्रवीण गोपाळराव देशकर, सचिव बादल नीलकंठ बेले, सहसचिव बाबा अन्वर बेग, कोषाध्यक्ष गणेश जयराम बेले, सदस्य म्हणून आनंद शिवराम भेंडे, मसुद अहमद शेख अहमद, राजेंद्र दत्तात्रय मोरे, आनंद दादाजी चलाख, नितीन रामचंद्र मुसळे यांची बहुमताने निवड झाली. या निवडणुक प्रक्रियेत ऍड. मनोज ज. काकडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी राजुरा तालुका पत्रकार संघ भूमिका अत्यंत चोख व कर्तव्यदक्षपणे पार पाडली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सर्व नियमाना अनुसरून पार पडली. ऍड. मनोज काकडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निरपेक्ष पद्धतीने वेळापत्रक जाहीर करून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही पार पाडली. शेवटी नवनियुक्त विजयी उमेदवारांना विजयी झाल्याबद्दलचे रीतसर प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी नवनियुक्त कार्यकारणीच्या वतीने पत्रकार संघ अनेक सामाजिक, शैक्षणिक, तसेच अन्यायग्रस्त, गरजू लोकांच्या भूमिका अत्यंत प्रखडपणे मांडेल असा विश्वास अध्यक्ष भीमय्या बोर्डेवार व सचिव बादल बेले यांनी यावेळी व्यक्त केला. शेवटी सर्वांचे आभार बादल बेले यांनी मानले.