बीडमधून बजरंग सोनवणे यांनी भरला उमेदवारी अर्ज.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- देशात शिव- शाहू -फुले- आंबेडकर यांचे विचार आणि संविधान वाचविण्यासाठी प्रचंड प्रमाणात लाट आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या 32 ते 35 जागा निवडून येण्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड येथे बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी थेट पालकमंत्राना आव्हान देत म्हटले की, पालकमंत्री महोदय तुम्ही आमची औकात काढू नका. आमची औकात काय आहे? हे आम्ही दाखवून दिलेले आहे. ज्या स्व. मुंडे साहेबांनी राज्यातील 25 साखर कारखाने यशस्वीपणे चालविले. ते सर्व तुम्ही बहीण भावाने बंद केले. त्यांनी काढलेले तीन साखर कारखाने देखील बंद पाडले. तर मी एक सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या सामान्य व्यक्ती दोन कारखाने यशस्वीपणे चालवीत असून मराठवाड्यात विक्रमी भाव देत आहे. ही आमची औकात आहे. तसेच भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मी मॅनेज नसून मरते दम तक शरद पवार साहेबांच्या विचारांचा पाईक राहील असे अभिवचन त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला खा रजनीताई पाटील राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक जीवनराव गोरे , शिवसेना उबाठा किशोर पोतदार, जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर , माजी आमदार पृथ्वीराज साठे, बबन गित्ते, फुलचंद कराड, नरेंद्र काळे, संगीता चव्हाण, अजिंक्य चांदणे, धम्मपाल कांडेकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार बदामराव पंडित, ईश्वर मुंडे, रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, भाई मोहन गुंड, ॲड. गोले, माजी आमदार उषाताई दराडे, सुदामती गुट्टे, शिवराज बांगर, सुशीला मोराळे, पूजा मोरे, विजय साळवे, दीपक केदार, कॉम्रेड नामदेव चव्हाण, गणेश वरेकर, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार सिराज देशमुख, अजय बुरांडे , हेमा पिंपळे , शिवाजीराव कांबळे, दादासाहेब मुंडे यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.
22 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. रजनीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला.त्यानंतर राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्याची संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीच्या ३२ ते ३५ जागा निवडून येणार आहेत. देशांमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचंड मोठ्या सभा होत आहेत. लोकांचं मत आता महाविकासकडे वळत आहे. आमच्याकडे नेते जास्त नाहीत. पण जनता मात्र प्रचंड प्रमाणात आमच्याकडे आहे. याची दक्षता घेण्याचा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तर बजरंग बप्पा सोनवणे हे बीड लोकसभेला निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले की, आता नेते नव्हे तर जनता आमच्या सोबत असून भाजप सरकार हे सत्तेच्या पाचपट सत्तेचा गैरवापर करीत आहे. निवडणुक ही गैरविश्वासाच्या मुद्द्यावर लढविली जात असून मी मॅनेज असल्याचा माझ्यावर आरोप होतोय. परंतु मी मरते दम तक शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराचा पाईक असून मी मॅनेज होणार नाही. असाही त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला. त्याच बरोबर पालकमंत्र्याचा विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले की, मी जरूर माझी छाती पडून धनंजय मुंडे आणि अजित दादा हे छातीत असल्याचे म्हणालो परंतु आणखी चार महिन्या नंतर निवडणूक संपल्या नंतर ते दोघेही शरदचंद्र पवार यांच्या पक्षात येतील परंतु त्यांना पक्षात घ्यायचे किंवा नाही हे आम्ही ठरवू. तसेच अहमदनगर ते परळी रेल्वे मार्ग विषयी बोलताना त्यांनी सांगितले की हा रेल्वे मार्ग २५६ किलोमीटर पासून १५ वर्षां मध्ये केवळ ९९ किलोमीटरचे काम पूर्ण झालेलं आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी २५ वर्षे लागतील. म्हणजे किमान दोन पिढ्या तरी हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार नाही. परंतु मी निवडून आल्या नंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये ही काम पूर्णत्वाकडे घेऊन जाईन. त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्गाची काम १० वर्षांत तरी पूर्ण होऊ शकलेले नाही. या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे २ हजार लोकांची जीव जाऊन अनेकजण जखमी व जायबंदी झालेले आहेत. ज्या पंकजाताई म्हणायच्या की, पुढच्या लोकसभेची निवडणूकीचा अर्ज भरताना मी रेल्वेने फॉर्म भरायला येईन. त्या खरच रेल्वेने उमेदवारी अर्ज दाखल करायला येणार का? असाही प्रश्न त्यांनी पंकजाताई मुंडे यांचे नाव न घेता केला आणि ज्या पंकजाताई म्हणत होते की मी प्रीतमताई चे ताट ओढून घेणार नाही. मग त्यांनी सख्ख्या बहिणीचं ताट का ओढून घेतलं? यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता? याचे उत्तर त्यांनी देण्याची मागणी केली