मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देसाईगंज:- सम्यक जागृत बौद्ध महिला समिती तर्फे दीक्षाभूमी देसाईगंज येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पाच दिवसीय प्रशिक्षण व प्रबोधन शिबीराचा आज निरोपाचा दिवस. पाच दिवस बच्चे कंपनीच्या किलबिलाटाने दीक्षाभूमी परीसरात उत्साह संचारला होता. आज शेवटच्या दिवशी साठच्या जवळपास बच्चे कंपनीने हजेरी लावली निरोपाचा दिवस असल्यामुळे 9 ते 5 अशी वेळ ठेवण्यात आली होती.
यावेळी वंदना सहारे यांनी त्रिशरण पंचशील घेऊन आनापान घेतले. तर आशिष घुटके यांनी क्रांतीबा महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजा अशोक व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच शूद्र पूर्वी कोण होते यावर भाष्य केले.
यानंतर सर्व उपस्थित नागरिकांना आणि शिबिराथी यांना सहभोजन देण्यात आले. त्यानंतर पाच दिवस चाललेल्या या शिबिरात सांगीतलेल्या माहिती वर पेपर घेण्यात आला. आणि शेवटच्या टप्प्यात प्रत्येक शिबीरार्थीला समिती तर्फे गिफ्ट देण्यात आले. यावेळी शिबिराथी मुलांनी गाणी म्हटली आणि शिबीरा बद्दल आप आपले मनोगत व्यक्त केले. शिबीराला मुलांचा येव्हडा भरभरून प्रतिसाद व त्यांचा उत्साह पाहून मुलांना निरोप देतांना मन थोडे उदास झाले. सर्वच मुलांनी अशी शिबीरे नेहमीच घेण्यात यावी असा आग्रह केला.
हे शिबीर सम्यक जागृत बौद्ध महिला समिती तर्फे आयोजित करण्यात आले होते. यावेळी जागृत बौद्ध महिला समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी खूप मेहनत घेतली. विशेष सहकार्य आशिष घुटके यांनी केले त्यांचे समिती तर्फे सचिव ममता जांभूळकर यांनी आभार मानले.