अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हिंगणघाट शहरातील पिंक बुथ ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वानुसार मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता आकर्षक मतदान केंद्र बनविण्यात आले होते.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या मार्गदर्शनात अनेक संकल्पना राबविण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने हिंगणघाट शहरातील सेंट जॉन हायस्कूल येथे महिला बहुसंख्य परिसरात पिंक बुथची निर्मिती करण्यात आली होती. या पिंक बुथ चे संचालन महिलांनी केले. यावेळी या पिंक बुथला आकर्षक अशा पिंक रंगाने सजावट करण्यात आली होती. यावेळी या बूथवर कर्तबगार महिलांचे फोटो लावून महिलांनी कर्तबगारी बजवांवी असा संदेश सुद्धा देण्यात आला होता. या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली होती. या मतदार केंद्रात मतदात्यांचे स्वागत सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आले.
यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या नेतृत्वाखाली अथक परिश्रमाने या पिंक बुथ ची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे हिंगणघाट विधानसभा निवडणुकीत हे बुथ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.