अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरवती:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावत येते जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे, यावेळी वडील थोडक्यात बचावले आहे. ही घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगर परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. आई कुंदा देशमुख वय 65 वर्ष आणि मुलगा सुरज देशमुख वय 25 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. वडिल विजय देशमुख गंभीर हे जखमी झाले आहेत.
मंगलधाम परिसरातील बालाजी नगर येथे एका आई आणि मुलाची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपी देवानंद लोणारे आणि पत्नी ज्योति लोणारे यांना पोलिस आयुक्त यांच्या विशेष पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगलधाम परिसरातील बालाजी नगरमध्ये देशमुख कुटुंब गेली अनेक वर्षे राहत होते. विजय देशमुख, कुंदा देशमुख, मोठा मुलगा अंकुश आणि लहान मुलगा सुरज असे चार सदस्य राहत होते. लहान मुलगा अंकुश एमआयडीसी मध्ये तर मोठा मुलगा सुरज अमरावती येथील एका कंपनीत नोकरीला होते. सोमवारी एमआयडीसी ला सुट्टी असल्याने सर्वजण घरी होते. देशमुख कुटुंबाच्या घरामोर काही महिन्यापूर्वी लोणारे कुटुंबाने घर खरेदी केले होते.
सोमवारी दुपारी रिकाम्या जागेवरुन देशमुख परिवाराला शिवीगळ करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून कुंदा देशमुख बाहेर आल्या. बाहेर आलेल्या कुंदा देशुमख यांना पाहून देवानंद लोणारचा राग अनावर झाला आणि त्याने बेसावध कुंदा देशमुख यांच्या डोक्यात पहारीने वार केला. आईच्य किंचळण्याचा आवाज ऐकून सुरज बाहेर आला तर त्याच्या डोक्यात देखील वार करण्यात आला. मुलगा आणि पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून विजय देशमुख वाचवण्यासाठी आले तर त्यांच्यावर देखील वार केला. गोंधळानंतर आजबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. बघ्यांची गर्दी पाहताच लोणार आक्रमक झाला आणि त्याने पुन्हा मुलावर आणि आईवर वार केले.
दरम्यान, लोणार घरी जाऊन पत्नी आणि मुलाला दुचाकीवर घेऊन फरार झाला. ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करत लोणारचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. फ्रेजरपुरा पोलिस घटनेचा तपास करत आहेत.