अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट: तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दारोडा येथे सोमवारी २९ एप्रिलला १० वाजताच्या सुमारास पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या भिमराव सत्तुजी आत्राम यांचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार दारोडा येथिल शिवशंकर मधुकर पुड यांच्या विट भट्टीवर भिमराव सत्तुजी आत्राम गेल्या चार ४ महिन्यांपासून काम करीत होते. ते विटभट्टीवर सिमेंट पोलवर लावलेला पाण्याचे मोटार चा स्टार्टर त्यांनी ड्रम भरणे करिता चालु केला. पाण्याचे ड्रम त्यांच्या मुलीने भरुन घेतले. काही वेळाने पाण्याचा ड्रम भरल्या नंतर भिमराव पाण्याची मोटार बंद करण्या करिता सिमेंट पोलवर लावलेल्या मोटार चा स्टार्टर बंद करण्या करिता लोखंडी घोडीवर चढून बंद करित असतांना त्यांना करंट लागल्याने ते खाली पडले. तेव्हा त्यांना शिवशंकर मधुकर पुंड यांच्या ट्रॅक्टर मध्ये टाकुन ग्रामिण रुग्णालय वडणेर येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्य घोषित केले.