अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १ मे:- सावनेर सटवा माता मंदिर येथील रहिवासी श्री. दिपक शेषराव पडोळे (बी.एस.सी. बी.एड. गणित) सहाय्यक शिक्षक म्हणून मानकर आदर्श विद्यालय वरोडा येथे ३१ वर्ष सेवा दिल्यानंतर नियत वयोमानानुसार वयाचे ५८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे दि.३० एप्रिल २०२४ ला सेवानिवृत्त झाले. त्याप्रसंगी छोटेखाणी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्यात श्री.दिपक पडोळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून नगरपरिषद सावनेरचे माजी उपाध्यक्ष गोपाल घटे आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दिलावर शेख, जवाहर कन्या विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक मुरलीधर खाटीक, श्रीकृष्ण विद्यालय मंगसाचे सेवानिवृत्त शिक्षक केरडे सर, मुख्याध्यापिका चित्रा राऊत मॅडम, जवाहर कन्या विद्यालयाचे शिक्षक भीमराव लाडेकर तसेच समाजसेवक नंदूभाऊ राऊत, वामन चांडवे आणि सटवा माता मंदिर परिसर मित्र मंडळ बारापात्रे, चंदू बालपांडे, अरुण कळंबे, मनीष गजभिये, विलास गुडधे, सुनील काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गोपाल घटे यांनी उद्गार काढले की सेवानिवृत्ती व्यक्तीला नवीन जबाबदारी स्वीकारण्यास समृद्ध बनविते. या कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत चकोले यांनी केले तर आभार भीमराव लाडेकर यांनी मानले.