पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी चिंचवड:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या चहोली येथे एका पत्नीने आपल्या दिरासोबत मिळून आपल्याच पतीच्या डोक्यात हत्याराने वार करत निघृणपणे हत्या केला. त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला अटक केली. ही घटना रविवारी रात्री 11.45 वाजताच्या सुमारास थोरवे वस्ती, चहोली येथे घटना घडली आहे.
हुजूर महमुद सय्यद वय 32 वर्ष, रा. थोरवे वस्ती, चहोली असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. सय्यद यांची 28 वर्षीय पत्नी आणि फिरोज महंमुद सय्यद वय 38, रा. मासाला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवे वस्ती, चहोली येथे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याबाबत आळंदी पोलिसांना रविवारी रात्री माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुजूर सय्यद यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता सय्यद मयत झाले होते. सय्यद यांनी घरात भिंतीला धडक घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.मात्र, पोलिसांना यात संशयास्पद वाटल्याने त्यांनी हत्येच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. तसेच सय्यद यांना झालेली जखम, घटनास्थळ वरील परिस्थिती, मृत्यूवेळेसची स्थिती आणि त्यांच्या मुलीने दिलेली माहिती ही सय्यद यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीशी सुसंगत नव्हती. तसेच पत्नीने घरातील रक्ताचे डाग साफ केले होते. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सय्यद यांची पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून त्यांचा हत्या करून हत्याराची विल्हेवाट लावली असल्याचा संशय चौकशीत व्यक्त होत आहे. आळंदी पोलिसांनी पत्नी आणि दिराला अटक केली आहे. पुढील आळंदी पोलीस तपास करीत आहेत.