संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- येथे महाराष्ट्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजुरा तहसील कार्यालयात 1 मे व कामगार दिनाचे औचित्य साधुन मुख्य शासकीय ध्वजारोहण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता संपन्न झाला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, रमेश नले, ज्येष्ठ पत्रकार उमाकांत धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सय्यद आसिफ, विकास देवडकर, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौड, मुख्याधिकारी सूरज जाधव, पोलिस निरीक्षक योगेश पारधी, कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, विनायक पायघन, नायब तहसीलदार गांगुर्डे, तेलंग, डोणगावकर मंडळ अधिकारी कृषी अधिकारी कर्मचारी, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित मान्यवर तसेच विधानसभा शेत्रातील समस्त नागरिकांना 1 मे व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.