विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- नॅशनल सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट नागपूर द्वारा संचालित विनोबा प्राथ. / माध्य. आश्रम शाळा, तलवाडा ता. अहेरी जि. गडचिरोली स्नेह मिलन सोहळा तथा सेवा निवृत्त कर्मचारी जिवन गौरव पुरस्कार समारंभ दिनांक 02 एप्रिल रोज गुरुवारला नॅशनल सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट नागपुर द्वारे राजलक्ष्मी सभागृह, आलापल्ली येथे ठिक 11.00 वाजता स्नेह मिलन सोहळा तथा सेवा निवृत्त कर्मचारी जिवन गौरव पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर वानखेडे, सरचिटणिस, अनुदानित आदिवासी आश्रम शाळा संघटना, नाशिक उद्घाटक म्हणुन शेखर टोगो (कार्यकारी संचालक) एनसिआरडी कार्यालय नागपुर, तसेच प्रमुख अतिथी म्हणुन राजेश मुन अध्यक्ष शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर, श्रिनिवास गणमुकुलवार अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानवता परिषद अहेरी, आशुतोष चटप, अध्यक्ष साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ चद्रपुर, गजानन पातोळे अध्यक्ष मातोश्री लक्ष्मीबाई शिक्षण संस्था चंद्रपुर यांना आमत्रित करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाला विनोबा प्राथ. माध्य. आश्रम शाळा, तलवाडा, हेडरी, पदेवाही, गदा, कोटमी, बिनागुंडा येथील मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला टोंगो साहेब यांचे पुष्प वर्षावाने स्वागत करण्यात आले व त्यांना मंचाकडे आदराने प्राचारण करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष महोदय तथा सर्व प्रमुख अतिथीचे स्वागत करून त्यांनी स्थान ग्रहण केले. त्यानंतर विद्येची आराध्य देवता माता स्वरस्वती, आचार्य विनोबाजी भावे व सुश्री. निर्मलालाई देशपांडे यांच्या प्रतिमांचे पुष्प माल्यार्पन करून व दिपप्रज्वलन करून विधिवत पुजन करण्यात आले. तसेच विनोबा आश्रम शाला कर्मचारी वर्ग तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत गिताने स्वागत करण्यात आले. तसेच सर्व शाळांचे सहशालेय उपक्रमाने फोटो प्रोजेक्टरद्वारे उपस्थित मान्यवरांना व कर्मचा-यांना चित्रिकरण करून दाखविण्यात आले. मंचावर उपस्थित मान्यवरांना संस्थेतर्फे वृक्षकुंडी, शाल-श्रीफल, व स्मृतीचिन्ह देवून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण एस.जी. शेंन्द्रे माध्य. मुख्या. विनोबा आश्रम शाळा तलवाडा यांनी केले असुन विनोबा आश्रम शाळांची विस्तृत माहिती करून दिली. उपस्थित शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे स्वागत शब्दसुमनाने करण्यात आले. तसेच विनोबा आश्रम शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री सोमनकर, श्री राउत, श्री खेडकर, कु. कोल्हटरकर व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री कांशिवार यांना मा. टोंगोसाहेब यांच्या हस्ते वृक्षकुंडी, शाल-श्रीफल, स्मृतीचिन्ह व भेटवस्तु देवुन जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन 2023-2024 मधिल उत्कृष्ठ कार्य करणा-या कर्मचा-यांना संस्थेतर्फे वृक्षकुंडी, शाल श्रीफल, स्मृतीचिन्ह व भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्कारमुर्तिची नावे व शाळा पुढिल प्रमाणे: यावेळी विविध शाळेतील शिक्षकाचा व इतराचा सन्मान करण्यात आला. त्यात उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक म्हणून व्ही.एल. बोमकंठीवार, वि. आ. शा. पंदेवाही उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक एस. के. वेनुगवार, वि. आ. शा. हेडरी. उत्कृष्ट अधिक्षक म्हणून पि.पु. मारकवार, वि. आ. शा. गेदा उत्कृष्ट स्वयंपाकी: जी.एस. आसमवार, वि. आ. शा. कोटमी, कु. एस.एम. निलिवार, वि. आ. शा. कोटमी. एस. जी. रनदिवे, वि. आ. शा. तलवाडा, उत्कृष्ट शिपाई: व्ही, एन, कोल्लुरी वि. आ. शा. हेडरी, उत्कृष्ट प्राथमिक मुख्याध्यापक टि. सी. तोटावार, वि. आ. शा. हेडरी, उत्कृष्ट माध्यमिक मुख्याध्यापक एस.जी. बगेन्द्रे, वि. आ. शा. तलवाडा, उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन विनोबा प्राथ व माध्य आश्रम शाळा, पंदेवाही, उत्कृष्ट शाळा शिक्षण – विनोबा प्राथ व माध्य आश्रम शाळा, गेदा यांना पुरस्कार वितरण करण्यात आला.
पुरस्कार वितरणानंतर सेवानिवृत्त शिक्षक श्री. सौमनकर मांनी आपल्या संस्येचे व आश्रम शाळेतील जीवनाबाबत मनोगत व्यक्त केले तसेच श्री. तोटावार प्राथ. मुख्या. हेडरी यांनी संस्थेमार्फत विद्यार्थाना पुरविण्यात सोईसुविधा, भौतीक सोईसुविधा याबाबत मार्गदर्शन दिले तसेच श्री चिटटीवार प्राथ. शिक्षक, गेदा यांनी शौक्षणिक गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण कशाप्रकारे विद्यार्थाना देण्यात येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख श्री राजेशजी मुन, श्री किशोरजी वानखेडे यांनी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे तसेच कर्मचा-यांचे अभिनंदन करून आश्रमशाळा सुव्यवस्थित कशा चालतिल याबाबत मार्गदर्शन केले. अनु. विनोबा प्राथ. माध्य. आश्रम शाळा, तलवाडा येथील पदविचर प्राय. शिक्षक श्री चदिकर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन श्री कोरेवार (मा.शि.) यांनी केले. अशा प्रकार स्नेह मिलन सोहळयाचा पहिला भाग संपविण्यात आला. लगेच उपस्थित सर्व पाहुण्यांच्या भोजनाचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. दुपारी ठिक 3.00 वाजता कार्यक्रमाचा दुसरा टप्पा म्हणजे कर्मचारी व परिवाराचे परिचय देण्यात आले. तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक मा. श्री टोंगो साहेब यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने विनोबा आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मोलाचे संदेश देवुन मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारे चर्चा सत्र संपवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.