राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन मुंबई:- देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुक सुरू आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यात काँग्रेस नेते विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, 26/11 च्या मुंबई वर झालेल्या हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) माजी प्रमुख आयपीएस हेमंत करकरे याना कसाबने नव्हे तर आरएसएस RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं गोळी घातली असा आरोप केला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत हा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी उज्ज्वल निकम यांनाही जबाबदार धरत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतील नव्हती. कोणत्याही अतिरेक्याची नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. त्यावेळी हे पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भाजप तिकीट देत असेल तर देशद्रोह्याला पाठिशी घालणारा पक्ष आहे का? असा आरोप करत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला आहे.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, उज्जल निकम यांनी बिर्याणीचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसची बदनामी केली. कसाबला कोणी बिर्याणी देईल का? आणि याच उज्वल निकम यांनी आपली चूक मान्य केली होती. उज्वल निकम कसला वकील आहे? ज्या गोळीने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला ती गोळी कसाबने नव्हे तर आरएसएस शी एकनिष्ठ असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने घातली होती हे सत्य न्यायालयापासून लपवणाऱ्या देशद्रोह्यांना भाजप तिकीट देत असेल, तर भाजप या गद्दारांना का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपचा जोरदार पलटवार – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या या आरोपावर भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, काँग्रेस आपली विशिष्ट व्होट बँकला खूश करण्यासाठी आणि ती मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. विजय वडेट्टीवार यांनी 26/11 च्या दहशतवाद्यांना क्लीन चिट देऊन हे सिद्ध केले आहे. त्यांच्या मते कसाबने शहीद हेमंत करकरे यांच्यावर गोळीबार केला नाही. दहशतवाद्यांचे समर्थन करताना काँग्रेसला अजिबात लाज वाटली नाही का? काँग्रेस आणि राजकुमार यांच्या विजयासाठी पाकिस्तानमध्ये प्रार्थना का मागितल्या जात आहेत, हेही आज संपूर्ण देशाला कळले आहे असं म्हणत विनोद तावडे याची वडेट्टीवार यांचे आरोप खोडून काढले.