अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २ मे २०२४ रोज गुरुवार ला सहाय्यक अभियंता पिंपळगाव शाखा नवीन वस्ती तुकडोजी वार्ड याना विद्युत पुरवठा वारंवार खंडित प्रकरणी निवेदन देण्यात आले.
या निवेदन मध्ये म्हटले आहे की, मागील एक महिन्यापासून संत तुकडोजी वार्ड क्रं ६ येथील निखाडे भवन ते मल्लारी पेट्रोल पंप, कलोडे मंगल कार्यालय ते बालाजी टाऊन, तुळसकर भवन, आदर्श नगर तसेच गजानन महाराज मंदिर परिसरच्या भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे त्या भागातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नगर परिषदचा पाणी पुरवठा एक दिवसा आड होत असल्यामुळे लोकांना या गोष्टीचा त्रास मोठया प्रमाणावर होत आहे. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे या उन्हाळ्यात लहान मुलं आणि वयोवृध्द मंडळींच्या प्रकुतीसाठी सुध्दा त्रास होत आहे. अश्या सर्व समस्याचां सामना त्या भागातील लोकांना होत असल्याने विद्युत विभागाने यावर ताबडतोब मार्ग काढून जनतेला या त्रासापासून मुक्त करण्यासाठी योग्य उपाय करन्याची मागणी सतीश धोबे तालुका प्रमुख (शिवसेना उबाठा) यांनी सहायक अभियंता श्री नळे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.
यापुढे जर विद्युत विभागाने हा विषयाला गंभीरपणे घेतले नाही तर शिवसेना प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.