नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- जिल्हातून एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. नाशिक जिल्हातील प्रेमी युगुलाने वणी गडावरील शीतकड्यावरुन सुमारे चारशे फूट खोल दरीत उडी घेऊन तरुण व अल्पवयीन तरुणीने जीवन संपविले. ही घटना दि. २८ एप्रिल रोजी घडली. मंगेश राजाराम शिंदे वय 24 वर्ष, रा. भायाळे, ता. चांदवड जि.नाशिक व प्रियंका संतोष तिडके वय 16 वर्ष, रा. वडनेरभैरव, ता. चांदवड, जि. नाशिक अशी मृतक प्रेमी युगुलाची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगेश आणि प्रियंका मोटर सायकलवरून (MH-15-HJ-5915) वडनेरभैरव येथून 28 एप्रिल रोजी सप्तश्रृंगी गडावर आले होते. या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे जाऊन सुमारे चारशे ते पाचशे फूट खोल दरीत उडी घेवून जीवन संपविले. त्यानंतर मुलीचा मृतदेह झाडाला अडकलेला होता. तर तरुणाचा मृतदेह दरीत आढळून आला.
ही घटना होऊन 6 दिवस झाल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती गुराख्यांनी भातोडेचे (ता. दिंडोरी) पोलीस पाटील विजय चव्हाण यांना दिली. त्यानंतर वणी पोलिसांत माहिती देण्यात आली. वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड दरीत उतरून मृतदेहाचा पंचनामा केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. मृत दोघांचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.