उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकाेला:- शहरातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील शिवसेना वसाहत परिसरात राहणाऱ्या 7 वर्षीय मुलीला घरात लावलेल्या कुलरचा करंड लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. युक्ती अमाेल गाेगे अस या मुलीचे नाव असून ती कुलर जवळ खेळत असतांना या कुलरमधील विजेचा करंड लागल्याने युक्तीचा जागेवरच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार शिवसेना वसाहत येथे राहणारे माजी नगरसेवक अमाेल गाेगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती ही घराजवळ खेळत असतांना अचाणक कुलरजवळ गेली. कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. युक्तीचे आई वडील व कुटुंबीय घरातच हाेते. मात्र त्यांच्या लक्षात येइपर्यंत युक्तीचा मृत्यू झाल्याचेच समाेर आले. मात्र युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले होते मात्र, डाॅक्टरांनी युक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. युक्तीच्या मृत्यूमुळे गाेगे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून दुःखाचे डाेंगर काेसळला.
कुलरमधील विजेचा धक्का लागल्यानेच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे प्राथमीक तपासणीत समाेर आले आहे. कुलरला असलेल्या बटनांचा एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपुर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरु असतांनाच युक्तीचा हात कूलरला लागला व विजेचा धक्का तीला लागल्याने यामध्येच तीचा मृत्यू झाल्याची माहीती आहे.
याची माहिती स्थानिक पोलीस विभागाला कळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले. आणि पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.