प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नागठाणा येते दारूच्या नशेत नेहमी वाद घालणाऱ्या पतीची अखेर कंटाळलेल्या पत्नीने गळा आवळून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला आहे. गणेश हरिभाऊ भलावी वय 40 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव असून पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने पतीच्या आत्महत्येचा बनाव रचला मात्र पोलीस तपासात पत्नीचे बिंग फुटलं अन् पोलिसांनी आरोपी पत्नी सुनीता गणेश भलावी हिला बेड्या ठोकल्या आहे.
पती नेहमी दारूच्या नशेत वाद घालत पत्नी आणि मुलाला मारहाण करायचा. अखेर संतापलेल्या पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर सुरवातीला पोलिसांची दिशाभूल करत नवऱ्याने आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने केला. मात्र, पोलीस तपासात हे बिंग फुटले आहे. दारूच्या नशेत होत असलेल्या घरगुती कलहातून झालेल्या वादात नवऱ्याची गळा आवळून हत्या करण्यात आली.
याप्रकरणी सावंगी पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरुन हत्येचा गुन्हा दाखल करीत आरोपी पत्नीस अटक करुन इतर तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये मृतकाची पत्नी सुनीता गणेश भलावी हिचा समावेश असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली आहे.
आरोपी पत्नी सुनिताने पती गणेशची हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा बनाव केला. त्याच्या गळ्यात ओढणी बांधून ठेवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना काही बाबी संशयास्पद वाटल्या. अखेर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपी पत्नीनेच हत्या केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे तिला बेड्या ठोकल्या.

