हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- काल जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. शहरात जागो जागी पाणी साचले होते. यातच गोल पूला मध्ये पाणी साचल्याने युवक काँग्रेस ने अनोखा निषेध करत तिथे कागदी नाव चालवले.
बल्लारपूर शहर दोन विभागात असून वस्ती विभाग ला जोडणारा गोल पुल आपली महत्वाची भूमिका बजावते. नुकतेच रेल्वे विभागाकडून नवीन लाईन टाकण्याचे काम केले. त्यात गोल पुलाला वाढवून त्याच्या वर रेल्वे लाईन टाकण्यात आले होते. ते काम होत असताना १५ – २० दिवस वस्ती विभागाचे संपर्क तुटले होते. त्यातच आता गोल पुलामध्ये खड्डे झाले असून थोडे ही पाऊस आला तर पाणी साचून राहते. त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच वाहन चालविणाऱ्या कसरत करावी लागते. काल पाऊस आल्यामुळे गोल पुलात पाणी साचले होते. याची दखल घेत युवक काँग्रेस ने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव चेतन गेडाम यांचा नेतृत्वात अनोखा प्रयोग करून शासनाचा निषेध केले.
यावेळी युवक काँग्रेसचे रोहित खान, बंटी पुसाला, जोश अंबाला, रवि यादव, दिपक जिल्ला, गोपाल कलवला, अरविंद वर्मा, बशीर सिद्धिकी, रोशन ढेंगळे, करण कामटे, सुनील मोतीलाल, रुपेश रामटेके, लक्ष्मण बहूरिया, श्रीकांत गुजरकर सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.