अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 09 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा उपविभाग हिंगणघाट प्रथकाच्या वतीने वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंदयावर प्रोरेड करीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरा कडुन गोपणीय माहिती प्राप्त झाली. एका कार मध्ये दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून प्रो. रेड केले. परंतु आरोपी संगत सिंग जुनी रा. वडनेर आणि कार चालक हे त्यांचे चार चाकी वाहन तेथेच सोडून मौक्या वरुन पसार झाले.
या कार्यवाहीत 33 खर्डाचे खोक्यामध्ये देशी दारूच्या गोवा नंबर 1 संत्रा कंपनीच्या 180 एमएल च्या 1,583 सिलबंद शिशा प्रति 150 रूपये प्रमाणे किंमत 2 लाख 37 हजार 450 रूपये एक मारुती सुझुकी कंपनीची विटारा ब्रेझा मेटँलीक रंगाची कार क्रमांक एम. एच. 27 बि. व्ही. 7328 किंमत 10 लाख रूपये अशी देशी दारू सहित 12 लाख 37 हजार 450 रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क्रमाक संगत सिंग जुनी व दुसऱ्या आरोपी याचा शोध घेतला असता मिळुन आले नाही. आरोपी विरुद्ध वडनेर पोलीस स्टेशन येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाही नूरूल हसन पोलीस अधीक्षक वर्धा, सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शन व निर्देशनाप्रमाणे, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, मनीष कांबळे, स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.