अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या तस्करांनी हौदास घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हिंगणघाट तालुक्यात पोलीस प्रशासनाने जोरदार कारवाई करत रेती तस्काराचे कुबडे मोडले असताना महसूल विभाग मात्र कोमात दिसून येत होता. त्यामुळे महसून विभागावर नागरिकांनी मोठे प्रश्न चिन्ह निर्माण केले होते.
त्यामुळे वर्धाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे मार्गदर्शनात हिंगणघाटचे तहसिलदार सतिश मासाळ यांनी अवैध रेती वाहतुकी विरुध्द दिनांक 11 मे 2024 रोजी रात्री मोठी कारवाई केली.
या कारवाई मध्ये मंडळ अधिकारी संजय नासरे, मंडळ अधिकारी विलास राऊत, तलाठी प्रेम बिमरुट, सय्यद अहमद, सतिश झोरे यांनी सहभाग घेतला. यावेळी रेती वाहतुक करणारे 4 टिप्पर जप्त करुन तहसिल मध्ये जमा करण्यात आले. व त्यांच्या विरुध्द दंडात्मक कारवाई सुरु आहे.
जप्त केलेल्या टिप्पर मालकांची नावे पंकज वानखेडे MH 40-N 7250, शुभम ढोक MH 31-CB 7759, चंद्रकांत सुरसे CG 17-H 3717, दिपक मेश्राम MH 31-CB 9401 अशी आहेत. आता कारवाही सोबतच रेती डेपोवर चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. आणि रात्री भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध रेती चोरी वर आळा बसणार आहे. हे चेक पोस्ट हिंगणघाट तालुक्यातील सावंगी, येळी व दारोडा डेपो वर लावण्यात आले. तसेच रेती डेपो वर बुकींगसाठी रेतीसाठा उपलब्ध आहे.
मागील वर्षी 2023-24 मध्ये एकुण 120 वाहनावर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीच्या कारवाया करण्यात आल्या असून
3 कोटी 9 लाख एवढी गौण खनिजातून वसुली करुन महसुल शासना कडे जमा करण्यात आलेला आहे. यावर्षी ही चेकपोस्ट व पथके तयार करुन अवैध रेती वाहतुकीवर अधिक तिव्र कारवाई
करण्यात येणार आहे.