युवक कांग्रेस आक्रमक बल्लारपूर येथील गोल पुलियावर पंधरा दिवसात कायमचा तोडगा काढा.
हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहर वासियाकरिता गोलापूल हा डोकेदुखी ठरला आहे. रेल्वेप्रशासनाचा हलगर्जीपणामुळे वस्ती विभागातील लोकांचे जाने येण्यासाठी अतोनात हाल होत आहे याची गंभीर दखल युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चेतन गेडाम यांनी घेतली असून आज दिनांक 13 मे रोजी स्थानिक रेल्वे प्रशासनाला एका निवेदनाद्वारे पंधरा दिवसाच्या आत गोल पुलाचे कायमची समस्या मिटवावी अन्यथा रेल्वे रोको सारखे आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला.
शहरात थोडाही पाऊस पडला असल्यास गोल पुलात पाणी साचते व जाणे बंद होते त्यामुळे वस्ती विभागातील व शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यापुढे हा त्रास सहन करणार नाही असा गंभीर इशारा ही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी युवक कांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. अरविंद वर्मा, सुनील मोतीलाल, गोपाल कलवाला, राहुल पाल रोहित ख़ान, रोशन ढेगले, बंटी पुसला, जूनेद सिद्दीक़ी, राजेश केशकर सह शेकडो नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

