माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी चादर चढवून घेतले दर्शन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आलापल्ली येथे बाबा सैलानी यांचा प्रसिद्ध दर्गा असून दरवर्षी याठिकाणी उर्स चा महोत्सव साजरा करण्यात येतो या उर्सला विदर्भ,छत्तीसगड सह तेलंगाणा वरून भाविक येथे येऊन चादर चढवून पूजाअर्चा करत असतात. आज भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून बाबा सैलानी यांच्या दर्ग्यात चादर चढवून पूजाअर्चा करून आशीर्वाद घेतले. यावेळी या उर्स महोत्सवाला आविस पदाधिकारी सह हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते.