हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- पावसाळा सुरू झाला की नाल्यातून वाहणारे पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकाच्या घरात आणि दुकानात घुसून मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे बल्लारपूर शहरात पावसाळा चालू होण्याआधी संपूर्ण शहरातील नाली साफसफाई करण्यात यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष उमेश कुंडले, विष्णु बुजोने जिल्हा उपाध्यक्ष बल्लारपूर तथा पदाधिकारी यांच्या उपस्थित बल्लारपूर नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मे महिना सुरू असून पावसाळाल्या केव्हा हि सुरुवात होऊ शकते. याच प्रसंगाला पाहून बल्लारपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे निवेदन द्वारे संपूर्ण बल्लारपूर शहरातील नाल्या साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी उमेश श्रावण कुंडले शहर अध्यक्ष मनसे यांचा नेतृत्वाखाली बल्लारपूर नगर परिषद उपमुख्याधिकारी यशवंत कातकर यांना निवेदन द्वारे करण्यात आली.
यावेळी निवेदन सादर करतांना गोपाल मोहुर्ले तालुका अध्यक्ष, अरुणाताई तोडसाम शहर अध्यक्ष महिला आघाडी बल्लारपूर, सामाजिक कार्यकर्ता विजेंद्र परमार, कुणाल सहारे, राहुल कामतवार, चेतन मंगाम, बादल मेश्राम, लोकेश कुरेकार, मोहन राजभर, योगराज चौधरी, राजेश कोणपतिवार सह शेकडो मनसे पदाधिकारी उपस्थित होते.