अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्कूल ऑफ स्कॉलर हिंगणघाटने आपली 100% निकालाची प्रथा कायम ठेवत याही वर्षी पुन्हा एकदा शंभर टक्के निकाल प्राप्त केलेला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सत्र २०२३- २४ चा इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला यामध्ये शाळेची विद्यार्थिनी नेतल टावरी ही 96% घेऊन प्रथम आलेली आहे तर इशिका विंसुलकर व राज केंद्रे या दोन्ही विद्यार्थ्यांनी 93% गुण घेऊन दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे. कार्तिकीय पांडे हा 92% गुण घेऊन तिसरा क्रमांक मिळविलेला आहे. तर कुमारी मेघना गोठे व कुमारी उत्कर्षा वरघाने या विद्यार्थिनींनी मराठी विषयात शंभर पैकी 100 गुण घेऊन गुणवत्ता प्राप्त केलेली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शालेय प्रशासन मुख्याध्यापिका शिल्पा चव्हाण मॅडम सह प्रशासकीय अधिकारी प्रदीप जोशी तसेच त्यांच्या विषय शिक्षकांना दिलेले आहे. सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले आहे व पुढेही शाळेचा निकालाचा दर्जा उत्तरोत्तर वाढवण्याची हमी दिलेली आहे.