अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लिपुर धोत्रा मार्गावर २६ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी महसूल विभागाच्या पथकासह अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडून कारवाई केली.
टिप्पर क्रमांक एम एच ३६ एफ १८२७ हात दिला असता पथकाला पाहून टिप्पर चालक टिप्पर सोडून पसार झाला. मात्र चालक वाहन सोडून पसार झाल्याने नेमकी हि वाळू कुठून आणली व कुठे जात होती कुणाची आहे. वाळू वाहतूकाचा परवाना होता की नाही यासंबंधी माहिती मिळू शकली नाही. उपविभागीय अधिकारी शिल्पाताई सोनाले आता अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्याने आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.