अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- मराठी भाषेचे थोर लेखक, नाटककार, शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे कै.राम गणेश गडकरी यांची जयंती सावनेर शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने गडकरी यांची १३९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शहरातील मुख्य चौकात असलेल्या त्यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांचे निवास्थान आदि ठिकाणी शहरातील सामाजिक संस्था राम गणेश गडकरी युवा मंच, गडकरी स्मृती निलयम आणि आकार रंगभूमी व सांस्कृतिक अकादमी व शहरातील साहित्य प्रेमींच्या वतीने राम गणेश गडकरी यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गणेश वाचनालय सभागृह राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयात भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गणेश वाचनालयाचे अध्यक्ष अँड. श्रीकांत पांडे, पुर्व नगराध्यक्ष व शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल, राम गणेश गडकरी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष किशोर धुंडेले, सचिव प्रथमेश देशपांडे, युवा समाजसेवी श्याम चव्हाण, अश्विन कारोकार, अमीत झोडापे, मुकेश झरबडे,सचिन मोहतकर,पीयुष झिंझुवाडीया, जाहिद शेख, मोहन छत्रे, पुरातत्व विभाग नागपुरचे सहाय्यक संचालक मयुरेश खडके,शिवदास दामोधर, देवेंद्र बोकडे, निकेश खुबाळकर, सचिन वानखेडे, हरी राउत आदींच्या उपस्थितीत कै राम गणेश गडकरी यांची १३९ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राम गणेश गडकरी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने संरक्षित केलेले निवासस्थानाला पुरातत्व विभाग नागपुर व्दारे फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते.

