मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान संपन्न झाले. वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा सोडण्यात आल्याने अनेकांनी आपला दावा केला होता पण शरद पवार यांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देऊन एका दगडात अनेक हवस्या गवस्याना गारद केले.
वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमर काळे यांनी निवडणूक लढविली पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत आणि खुद्द शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी अमर काळे साठी जोरदार मोर्चबांधणी केली होती पण हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही स्थानिक नेते आपल्या सार्थासाठी निवडणुक प्रचारात दिसून आले नाही. असा ओरड कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे अशा नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच धारेवर धरलं ‘तुम्हाला कुठं थांबायचं अन् कुठं जायचं हे स्पष्ट करा’, अस म्हणत खडेबोल सुनावले! असल्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले वर्धा लोकसभा मतदारसंघातील हिंगणघाट येथील नेत्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात रस घेतला नाही. जेव्हा एखादी मोठा नेता आला तेव्हा फोटो काढून घेत आपण खूप ऑक्टिव असल्याचे दाखवत होते. पण स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांना याबाबत अनेक तक्रारी केल्या त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नेत्याचा चांगलाच समाचार घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या या नेत्यांना मोठा झटका मानला जात आहे.
अन् लोकसभा निवडणुकी दरम्यान या नेत्यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारा विरुद्ध विसंगती भूमिका दिसून येते होती. अशी हिंगणघाट तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्याचा मनाची संभ्रमावस्था दिसून येत होती. त्यामुळे या नेत्यांच्या मनात काहीतरी वेगळे चाललं आहे, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.