संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघातर्फे दि. २७ व २८ मे ला दोन दिवशीय कार्यशाळा व हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार समारोहाचे आयोजन लोनावळा, पुणे येथे करण्यात आले होते. या समारोहात श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय , राजुरा जिल्हा चंद्रपुर च्या हिंदी विषयाच्या अध्यापिका प्रा. सुनीता जमदाड़े यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिंदी भाषेच्या प्रचार – प्रसारा करिता केलेल्या योगदाना बद्दल प्रा. सुनीता जमदाड़े यांना कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉ. विजयकुमार रोड़े, विभागाध्यक्ष सावित्रीबाई फुले विश्वविद्यालय पुणे तथा हिंदी संघाचे राज्य अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, बारामती, पुणे यांच्या हस्ते सम्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष प्रा. सुंदर लोंढे, नागपुर विभाग अध्यक्ष प्रा. जावेद शेख, नागपुर विभाग उपाध्यक्ष प्रा.ज्योति शर्मा , नागपुर विभाग सचिव नीता तंगडपल्लीवर तथा संपूर्ण राज्यभरातून हिंदी अध्यापक वृंद उपस्थित होते.
यावेळी प्रा.सुनीता जमदाड़े यांनी आपल्या या उपलब्धिचे श्रेय आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजूराचे प्राचार्य श्री एस. एम. वारकड़ सर उपप्राचार्य खैरानी सर आणि आपले जीवनसाथी श्री अरूण जमदाडे यांना दिले. यावेळी महाविद्यालयाच्या संपूर्ण अध्यापक यांनी प्रा सुनीता जमदाड़े यांचे अभिनंदन केले.