अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- विद्या प्रसारक मंडळ सावनेर द्वारा संचालित जवाहर विद्यालय वाकोडीच्या विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे त्यात शाळेच्या १००% निकालाने शाळेचे नाव लौकिक केले. परीक्षेला एकूण ३१ विद्यार्थी बसलेले होते. त्यात सर्व विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
या परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक कु. काजल सुभाषजी खोरगडे ८६.६०% गुण, द्वितीय कु. अंशुजा कृष्णाजी वैरागडे ८६% गुण, तृतीय कु.हेतांशी प्रभाकरजी पराते ८४.६०% गुण,चतुर्थ क्र.मन संजयजी खोरगडे ८१.४०% गुण, पाचवा कु.अनुष्का प्रभाकरजी संभे ८०.६०% गुण घेतले. तर प्राविण्य श्रेणीत ९, प्रथम श्रेणीत १०, द्वितीय श्रेणीत ११, तृतीय श्रेणीत १ विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
यावेळी उत्तीर्ण झालेल्या सर्वं विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक, गावकरी यांनी अभिनंदन केले.

