उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने मेहकर येथे तहसिलदार यांच्या मार्फत शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली मेहकर तहसिलदार यांना निवेदन सादर केले.
इयत्ता ३ री ते १२ वीचा पाठ्यक्रम शालेय अभ्यासक्रमात श्लोक आणण्याचे धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीमुक्ती क्रांतीचे मनुस्मृतीचे दहन शालेय अभ्यासक्रमात आण्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धार्मिक अजेंडा राबवून मते मिळवण्यासाठी हिंदू राष्ट्राची भाषा असां, मनुस्मृतीतील श्लोक शालेय शिक्षणात आणण्याचे धोरण असो हे निंदनीय आहे. तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने तीव्र शब्दांत या धर्मसत्ताचा निषेध करत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गाडून टाकलेली मनूस्मृती जिवंत करण्याचा हा खोडसाळपणा आहे. स्त्रीमुक्तीच्ये आंदोलन उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. स्त्रियांचे बहुजनांचे सामाजिक स्वातंत्र्य हिरावून धार्मिक हुकुमशाही रुजविण्याचा हा खेळ आहे. धर्मनिरपेक्ष भारतात शैक्षणिक क्षेत्रात एका धर्माचा उदो उदो योग्य नाही. संविधान बदलणार नाही म्हणायचं आणि श्लोक आणून संविधान बदलण्याच्या दिशेने वाटचाल करायची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने मागणी करत आहे, जर शालेय शिक्षणात नवे बदल घडवायचे असतील तर महाड रायगडच्या पायथ्याशी जाळून टाकलेली मनूस्मृती दहन क्रांती अभ्यासक्रमात आणावी आणि येणाऱ्या पिढ्यांना या आधुनिक क्रांतीचे धडे दृयावेत, हाच नवा बदल आहे. तात्काळ श्लोक आणणारे धोरण रद्द करा आणि मनुस्मृती दहन क्रांती अभ्यासक्रमात समावेश करा अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे.

