अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून तस्करी केल्या जात आहे. त्यामुळे वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे मार्गदर्शनात हिंगणघाटचे तहसिलदार सतीश मासाळ यांनी दिनांक 03 जुन 2024 रोजी अवैध रेती वाहतुकी विरुध्द रात्री मोठी कारवाई केली. या कारवाई मध्ये नायब तहसिलदार एम.एस. भलावी, तलाठी सय्यद अहमद, तलाठी प्रेम भिमरुट, महसुल सहायक पंकज वाघमोडे यांनी सहभाग घेतला. आणि रेती वाहतुक करणारे 4 ट्रॅक्टर तहसिल मध्ये जमा केले आहे. व त्यांच्या विरुध्द दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.
यावेळी महसुन विभागाने जप्त केलेल्या ट्रॅक्टर मालकाची नावे 1) राजेंद्र अंबादास खडसे रा.वाढोणा बा. तह. राळेगाव जि. यवतमाळ MH-32 AS-0023 2) प्रतिक वाढोणकर रा. वाढोणा बा. तह. राळेगाव जि. यवतमाळ MH-29 BV-7299 3) रामेश्वर डोमाजी ईरुळकर रा. परसोडा तह. राळेगाव जि. यवतमाळ MH-29 BC-4860 4) संदीप देऊळकर रा. मौदापूर तह. राळेगाव जि. यवतमाळ MH-29 Y-5920 अशी आहेत.
तसेच रेती डेपो वर चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. आणि रात्री चे भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. ज्यामुळे अवैध रेती चोरी वर आळा बसणार आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावंगी, येळी व दारोडा डेपो वर चेक पोस्ट लावले आहे. तसेच रेती डेपो वर बुकींगसाठी रेती साठा उपलब्ध आहे.
मागील वर्षी 2023-24 मध्ये एकुण 120 वाहनावर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक करण्यावर कारवाया करण्यात आल्या असून 3 कोटी 9 लाख एवढी गौण खनिजातून वसुली करुन महसूल शासनास जमा करण्यात आलेला आहे. यावर्षी ही चेकपोस्ट व पथके तयार करुन अवैध रेती वाहतुकी वर अधिक तिव्र कारवाई करण्यात येणार आहे.