श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हातील परळी वैजनाथ येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेमिकेने आपल्याच प्रेमाची विष पाजून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. मारुती भरत चौधरी वय 32 वर्ष, रा कारबेटवाडी ता. सोनपेठ जि. परभणी) असे मृत प्रियकराचे नाव आहे.
प्रियकर व प्रेमिकेचे भांडण झाले त्यामुळे प्रेमसंबंध ताणले गेले. याचा राग प्रेमिकेच्या मनात घर करून होते. त्यामुळे प्रेमिकेने धर्मापुरी फाट्यावरील एका आखाड्यावर या प्रियकराला बोलावून गुरूवारी (दि.६) मारहाण केली व त्यानंतर विष पाजून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मारुती चौधरी याचे आपल्या प्रमिके बरोबर काही कारणांवरून भांडण झाले. याचा राग मनात धरून प्रमिकेने मारुती याला आज धर्मापुरी फाट्यावर एका अखाड्यावर बोलावून घेतले. व त्यानंतर 7 जणांच्या मदतीने त्याला मारहाण करत त्याला विष पाजले. त्यानंतर अत्यावस्थ अवस्थेत त्याला काही नागरिकांनी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शेषराव भरत चौधरी वय 27 वर्षे रा. कारबेटवाडी जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून यशवंत मनोहर देवकते, प्रियंका प्रभाकर चौधरी, सोनेराव मनोहर देवकते, रेखा मनोहर देवकते, मनोहर सोनेराव देवकते, कृष्णा श्रीरामे, नाईकवाडे (पुर्ण नाव माहीत नाही), गौरव (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. बुक्तरवाडी ता. सोनपेठ जि. परभणी या आठ आरोपीविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हे करत आहेत.