हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दरवर्षी पावसाळ्यात शहरात डेंगू, मलेरिया, स्वाईन फ्लू, टायफॉइड, डायरिया सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो व आरोग्य सुविधांसाठी अनेकदा जनतेला त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या निर्देशानुसार शहर संघठनमंत्री रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वात पक्षाच्या शिष्टमंडळाने आज शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गजानन मेश्राम यांची भेट घेऊन पावसाळ्यापुर्वी मलेरिया, टायफॉइड, डेंगू, स्वाईन फ्लू व डायरिया या रोगांवरील औषधसाठा व किट लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी केली.
यासह कोणत्याही रूग्णाला बाहेरून औषध घेण्याची गरज पडू नये व रूग्णांना चंद्रपुर च्या रूग्णालयात जाण्याची गरज पडू नये अशी व्यवस्था बल्लारपूर ग्रामीण रूग्णालयातच करावी अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली. तसेच पावसाळ्यात त्वचेचे विकार देखील वाढतात त्यावरही औषधसाठा उपलब्ध व्हावा हि मागणी करण्यात आली.
यावेळेस उपाध्यक्ष अफजल अली, शहर प्रवक्ता आसिफ हुसेन शेख, महिला अध्यक्ष किरण खन्ना, उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, मयुरी तोडे, समीर शेख, निसार शेख, विवेक पिंपळे सह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.