अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- व्यापारी, कामगार व शेतकरी वर्ग असलेल्या हिंगणघाट उपविभागात आरोग्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून छोटया मोठ्या आजरपणा साठी रुग्णांना बाहेरगावी जावे लागत असल्याने अनेक गरीब रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतं आहे. अनेकदा आंदोलन व निवेदन देऊनही प्रशासन निष्क्रिय होऊन तमाशा बघत आहे. यात गोरगरीब जनता मात्र विनाकारण भरडल्या जात असून आरोग्याच्या या गैरव्यवस्थे विरुद्ध पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहारचे रुग्णमित्र गजू कुबडे यांनी दिलेला आहे.
यासंदर्भात गजू कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी 45 डिग्री या भर तापमानात अनवाणी पायाने केलेल्या प्रायश्चित आंदोलनाची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयात फक्त गर्भवती महिलांची सोनोग्राफी सुरू करण्यात आली. परंतु सामान्य रुग्णांना सोनोग्राफी साठी वर्धा, सेवाग्राम, सावंगी किंवा खासगी रुग्णालयात जावं लागते. त्यामुळे गरजू रुग्णांना खूप मोठा आर्थीक भुर्दंड व मानसिक त्रास होत आहे. हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात 3 वर्षांपासून सि. टी. स्कॅन मशीन पेटी बंध पडून आहे, आणि परिसरातील रुग्णांना सि. टी. स्कॅन साठी सेवाग्राम, वर्धा, सावंगी किंवा नागपूरला जावं लागते. त्यामुळे रुग्णांना व परिवारातील सदस्यांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु ही मशीन सुरु करण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्याची व्यवस्था करण्यात का येत नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
गेल्या दीड, दोन वर्षापूर्वी येथील लोक प्रतिनिधीने खूप मोठ्या थाटामाटात उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर आयसीयु चे उद्घाघाटन करून लाखो रुपयांचा चुराडा केला. परंतु उद्घघाटनच्या दिवसा पासूनच मॉड्युलर आयसीयु हे कुलूप बंद आहे. वारंवार सुरू करण्या संदर्भात विचारणा केली असता आपल्या उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर नसल्याचे कारण देण्यात येत होते. परंतु आता उपजिल्हा रुग्णालयात डॉ.शिंदे फिजिशियन रेग्युलर असूनही मॉड्युलर आयसीयु हे कुलूप बंद खोलीत धूळ खात का आहे, याचे उत्तर कुणीच देत नाही.
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बोर्ड आहे त्या बोर्ड मध्ये आपल्या इथे फक्त हाडाचे रुग्णांनाच तपासले जाते बाकी फिजिशियन डॉक्टर यांच्या अंतर्गत येत असलेल्या (उदा. लकवा) अशा दिव्यांग रुग्णांना वर्धा येथे पाठविण्यात येत आहे. अपघाती रुग्णांना जिल्ह्याबाहेर रेफर केले असता व 108 रुग्णवाहिका उपलब्ध नसताना आपल्या रुग्णालयातील 102 ही रुग्णवाहिका रुग्णांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी. परंतु 102 ही गाडी जिल्ह्याबाहेर नेण्यास परवानगी नाही हे सांगून १०२ गाडी दिली जात नाही. मग ही गाडी शो रूम मधे सजविण्यासाठी साठी आहे काय, असा प्रश्न विचारल्या जात आहे.
या सोबतच रुग्णालयात लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया तातडीने सुरू कराव्या अशी मागणी रुग्णमित्र गजू कुबडे यांनी केली आहे. या सर्व बाबींवर योग्य कारवाई न झाल्यास प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गजू कुबडे यांनी दिलेला आहे.
निवेदन देते वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख सुरज कुबडे, प्रहारचे माजी शहर प्रमुख अजय लढि, हेमंत महाजन सर, सतीश गलांडे, प्रशांत आवारी, सागर आत्राम, रितेश गुडधे, समीर मानकर, संकेत सातपुते, मयूर पुसदेकर, राजू पडोळे, विरु तोडसाम, दर्शन धानोरकर, इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.